Loading...
Image
Image
View Back Cover

मूल्यांचे पुनरुज्जीवन

नैतिक व्यवहार, विश्वासार्हता आणि सुशासन यांची गुरुकिल्ली

Edited by:

 • भरत वख्लू - अध्यक्ष, वख्लू अॅडव्हायजरी
 • ई. श्रीधरन - प्रमुख सल्लागार आणि माजी व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन

भारतीयांनी नैतिक राष्ट्रनिर्माण करण्याच्या दृष्टीने ‘मूल्यांचे पुनरुज्जीवन’ हा खंड म्हणजे आपल्या मूल्य-निद्रिस्तावस्थेला मिळालेला एक धक्का आहे. या खंडासाठी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या विचारवंतांनी, धुरीणांनी लेखन केले आहे. ही सर्वच मंडळी राहणी आणि विचारसरणीतील निष्ठा, सचोटीबद्दल सर्वज्ञात आहेत. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिकेसह समाजाच्या सर्वच क्षेत्रांत प्रामाणिक, नैतिक आणि पारदर्शी व्यवहारांचा अभाव का जाणवत आहे, याची मीमांसा हे पुस्तक करते.

अनेक लेखांमध्ये नैतिक व्यवहार, विश्वासार्हता आणि सुशासनाचा संस्थात्मक दर्जा वाढवण्याविषयी साधार आणि व्यवहार्य सूचनांची, उपायांची चर्चा अंतर्भूत आहे. यांतील काही लेख नवी दिल्लीत नोव्हेंबर २००८मध्ये फाउंडेशन ऑफ रिस्टोरेशन ऑफ नॅशनल व्हॅल्यूज या संस्थेने भरवलेल्या दोन दिवसांच्या परिषदेमध्ये सादर करण्यात आले होते. त्या परिषदेत मांडलेल्या विचारांचे संचित या खंडात आढळते. निव्वळ परिषदेपलीकडे जाऊन वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवरील विचारांची, उपायांची दिशा योगदानकर्ते मांडतात, ज्यायोगे भारताला एका स्वाभिमानी देशामध्ये परिवर्तित करता येऊ शकेल.

 • संदेश स्वामी भूमानंद तीर
 • चार शब्द रतन एन. टाटा
 • प्रास्ताविक
 • आभार
 • परिचयः नैतिक, मूल्याधिष्ठित समाज निर्माण होण्यासाठी काय केले पाहिजे? भरत वख्लू 
 • अंतर्यामीचे सत्य प्रज्वलित करा अरुण मैरा
 • कायदे अंमलबजावणी आणि न्याय संस्था यांमधील मूल्ये डी. आर. कार्तिकेयन
 • राष्ट्रीय मूल्यांच्या जोपासनेसाठी संभाव्य निराकरणे ए. पी. जे. अब्दुल कलाम
 • भारतातील सार्वजनिक प्रशासनः नैतिक समस्येचा तिढा ई. श्रीधरन
 • भारतीय समाजाचा पुनर्जन्म फादर टी. व्ही. कुन्नुंकल
 • मूल्ये विरुद्ध संस्थाः खोट्या द्विभाजनापलीकडे जयप्र काश नारायण
 • राष्ट्रीय मूल्य समस्या आणि त्यांचे निराकरण जे. एस. वर्मा 
 • भ्रष्टाचार नष्ट करणे आणि संघर्ष सोडविणेः सामाजिक नीतिमत्तेसाठी आवश्यक घटक के. जी. बालकृष्णन
 • संसदेतील संस्थात्मीकृत सचोटीची बाब एम. एन. वेंकटचलय्या
 • मूल्यांच्या पुनरुज्जीवनातील नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका लालकृष्ण अडवानी
 • प्रामाणिकपणा हवाहवासा बनवणे मधू त्रेहान
 • न्यायप्रदानाकरिता मूल्याधिष्ठित प्रणालीची संरचना एन. विठ्ठल
 • तुमची मने व हृदये राष्ट्रीयीकृत करा स्वामी भूमानंद तीर्थ
 • आपल्या समग्रतेचे स्मरण अरुण वख्लू 
 • राष्ट्रीय मूल्येः प्रशासनाचे वास्तव आणि उद्दिष्ट प्रत्युष सिन्हा 
 • कायदे अंमलबजावणीतील प्रामाणिकताः जनतेच्या विश्वास प्राप्तीची अनिवार्यता शंकर सेन
 • मूल्याधिष्ठित अभिनव राष्ट्रीय व्यवस्था सोमनाथ चॅटर्जी
 • लोकशाहीमधील मूल्यांची गरज टी. एस. कृष्णमूर्ती
 • परिवर्तनासाठी भारतीय अधिष्ठान त्रिलोचन शास्त्री 
 • शासनातील नैतिकताः दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगामधील दृष्टिकोन गोपाल गणेश
भरत वख्लू

भरत वख्लू, परिवर्तनशील विचारप्रवर्तक, नवोन्मेषी आणि नैतिक मूल्यनिर्माता, नेतृत्व मार्गदर्शक, प्रमुख वक्ते आणि लेखक आहेत. गेली जवळजवळ ३५ वर्षांहून अधिक काळ कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव त्यांच्याकडे असून, या काळात त्यांनी अनेक कंपन्यांचा कायापालट केला, गुंतागुंतीच्या उद्योगविषयक समस्यांचे सर्जनशील प्रकारे निराकरण केले आणि सुयोग्य, अपेक्षित परिणाम साधण् ... अधिक वाचा

ई. श्रीधरन

ई. श्रीधरन, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रमुख सल्लागार आणि माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. सध्या ते देशातील विविध शहरांतल्या मेट्रो प्रकल्पांना मार्गदर्शन करत आहेत. कोकण रेल्वे व दिल्ली मेट्रो प्रकल्प ठरलेल्या अंदाजपत्रकानुसार आणि वेळेअगोदर पूर्ण करणारे ज्येष्ठ तंत्रज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. जुलै २०१७मध्ये कोची मेट्रो प्रकल्प त्यांच्याच उत्क ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in