Loading...
Image
Image
View Back Cover

विकासाचे अर्थशास्त्र

सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने

 • सय्यद नवाब हैदर नक्वी - एचईसी डिस्टिंग्विश्ड नॅशनल प्रोफेसर, फेडरल उर्दू युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इस्लामाबाद

हे नवीन पाठ्यपुस्तक विकास आणि समावेशक वृद्धीच्या मूलतत्त्वांची चिकित्सक दृष्टिकोनातून चर्चा करते. त्याचबरोबर विकास, वृद्धी, समता, गरिबी यांच्यातील तरल संबंधांवषयी वेगळी भूमिका मांडते.

विकासाचे अर्थशास्त्र : सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने हे पुस्तक अशी भूमिका मांडते, की वृद्धी, उत्पन्नाचे वितरण आणि गरिबी निर्मूलनावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी विकास धोरणांचे मूलभूत उद्दिष्ट सर्वसमावेशक वृद्धी हे असले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यांकडे हे पुस्तक तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहते, तसेच विकसनशील देशांनी राबवलेल्या यशस्वी आणि अयशस्वी धोरणांचा धांडोळा घेऊन त्यांचे विश्लेषण करते.

हे पुस्तक अनेक दशकांतील संशोधनाचा आणि धोरण निश्चिती व अंमलबजावणीतील अनेक वर्षांच्या अनुभवाचा परिपाक आहे. विकसनशील देशांच्या विकासाची मांडणी करण्यासाठी लेखक विकास क्रांतीचे मूळ आणि प्रगती, उदारमतवादी प्रारूप आणि मानवी विकासाच्या माध्यमातून सर्वसमावेशक वृद्धी यांचा लेखाजोखा सादर करतो.

 • प्रस्तावना
 • आभार

विभाग १: पसरलेले पंख

 • १९५० नंतरच्या सर्वसमावेशक वृद्धीच्या विकास धोरणांची स्पर्धात्मक सापेक्षता: पूर्वावलोकन
 • विकास प्रक्रियेचा अनुभव

विभाग २: वैकासिक क्रांतीची चिकित्सा

 • वैकासिक क्रांतीचे पुनःपरीक्षणः किती वास्तव?
 • वैकासिक क्रांतीच्या प्रेरणा
 • वैकासिक क्रांतीः खुली होती का बंदिस्त?
 • वैकासिक क्रांती आणि सर्वसमावेशक वाढीचा ध्यास

विभाग ३: उदारमतवाद एक दुःस्वप्न

 • उदारमतवादाचा उद्रेक
 • उदारमतवादाचा चढता आलेख
 • नैतिक अधिकारांचे उदारमतवादी तत्त्वज्ञान आणि त्यांची आर्थिक विषयपत्रिका
 • उदारमतवादाने सर्वसमावेशक वृद्धीकडे केलेले दुर्लक्ष

विभाग ४: उदारमतवादाची एक लाट सामावून घेणे

 • उदारमतवादासमोरील सैद्धान्तिक आव्हाने
 • खाजगीकरणाची काळी बाजू
 • संरचनात्मक समायोजन उपक्रम आणि सर्वसमावेशक नसणारा विकास
 • उदारमतवादाचा नीतिनिरपेक्ष पाया

विभाग ५: मानव संसाधन उपक्रम

 • मानव विकास उपक्रम
 • सर्वप्रथम मनुष्यबळ विकास व्यूहरचना
 • सर्वप्रथम मनुष्यबळ विकास आणि विकासकेंद्रित व्यूहरचना यापैकी एकाची निवड
 • वृद्धीसंबंधित समस्या आणि मानवी विकास उपक्रम
 • मानव विकास उपक्रम आणि सर्वसमावेशक विकासाचा ध्यास

विभाग ६: सर्वसमावेशक विकास

 • सर्वसमावेशक विकास व्यूहनीती
 • सर्वसमावेशक विकास व्यूहनीतीची मूलतत्त्वे
 • सर्वसमावेशक विकासाचा शोध
 • वृद्धी, समानता आणि दारिद्र्य यांमधील मूलभूत संबंध
 • सर्वसमावेशक विकासाचे सुलभीकरण
 • सर्वसमावेशक विकास व्यूहनीतीची नैतिक प्रेरणा
 • प्रखर वास्तव उजेडात आणणे
सय्यद नवाब हैदर नक्वी

सय्यद नबाब हैदर नक्वी हे सध्या फेडरल उर्दू युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, इस्लामाबाद येथे सन्माननीय राष्ट्रीय प्राध्यापक आणि महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दीर्घ आणि अतुलनीय शैक्षणिक कारकिर्दीबद्दल २००९ मध्ये त्यांना शैक्षणिक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in