Loading...
Image
Image
View Back Cover

हिंदुत्व-मुक्त भारत

दलित-बहुजन, सामाजिक-आध्यात्मिक आणि वैज्ञानिक क्रांतीवरील चिंतन

 • कांचा अइलैय्या - मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, तेलंगाना, प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, उस्मानिया विद्यापीठ

‘हिंदुत्व-मुक्त भारत’ हे कांचा अइलैय्या यांचे पुस्तक समाजातील रूढ आणि प्रस्थापित परंतु जुलमी सामाजिक मानके धुळीला मिळवते. ‘व्हाय आय अॅम नॉट अ हिंदू’ या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाच्या लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या या आणखी एका विचारप्रवर्तक पुस्तकातून ते ब्राह्मणवादाची आणि भारतातील जाती व्यवस्थेची सखोल चिकित्सा करतात. अ-वैज्ञानिक आणि अ-राष्ट्रीय भूमिकांमुळे हिंदुत्ववादाचा लवकरच ऱ्हास होईल, असे भाकीतही ते वर्तवतात.

लेखकाच्या मते आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक दडपशाही ही नेहमीच राष्ट्र-राज्यांच्या भविष्यासाठी धोकादायक असते. जातीय राजकारणावर हल्ला चढवत हे पुस्तक हिंदुत्वाच्या चष्म्यातून मांडलेल्या ऐतिहासिक विचारांना आव्हान देते. राष्ट्रहितासाठी विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगण्याची गरज विशद करते. दलित-बहुजन समाजातील अप्रकट वैज्ञानिक आणि उत्पादनशील क्षमतांना दाबून ठेवणारा बुरसटलेला धर्म अशा शब्दांत कांचा अइलैय्या हिंदू धर्माचा समाचार घेतात. एक संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक!

 • विषयप्रवेश
 • मोबदला न मिळालेले शिक्षक
 • अज्ञात वैज्ञानिक
 • उत्पादक सैनिक
 • जनसामान्यांमधले स्त्रीवादी
 • समाजाचे शल्यविशारद
 • मांस आणि दुधाचे अर्थशास्त्रज्ञ
 • अज्ञात अभियंते
 • अन्नधान्याचे उत्पादक
 • सामाजिक तस्कर
 • आध्यात्मिक फॅसिस्ट
 • बुद्धिजीवी गावगुंड
 • नागरी युद्धाची चिन्हे आणि हिंदुत्वाची अखेर
 • उपोद्घात: हिंदुत्व-मुक्त भारत
कांचा अइलैय्या

कांचा अइलैय्या हे एक तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक असून ते उस्मानिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. भारतीय जातीव्यवस्थेच्या विरोधातील वैचारिक चळवळीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे, तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दलित-बहुजन प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांचा जन्म एका कुरुम गोल्ल (एक ‘इतर मागासवर्गीय जात’) कुटुंबात झाला ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in