Loading...
Image
Image
View Back Cover

कोण फसवते आणि कसे?

घोटाळे, लबाडी आणि कॉर्पोरेट विश्वाची काळोखी बाजू

सुस्थापित असे उद्योगपतीही फसवणूक का करतात? कॉर्पोरेट घोटाळे आणि लबाडीचे प्रकार नेमके होतात तरी कसे? उद्योजक त्यांनी वर्षानुवर्षे पणाला लावलेली इभ्रत पणाला का लावतात?

कॉर्पोरेट जगतातील उद्भवणाऱ्या अशा घोटाळ्यांचे आणि फसवणुकींचे नेमके वर्णन ‘कोण फसवते आणि कसे?’ या रॉबिन बॅनर्जी लिखित पुस्तकात पाहायला मिळते. सहा वर्षांच्या अथक संशोधनानंतर गतकाळातील अनेक कॉर्पोरेट गुन्ह्यांचा, त्यांमागील पार्श्वभूमी आणि परिस्थितींचा लेखाजोखा आपल्यासमोर येतो. ५००हून अधिक मोठ्या कंपन्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पहिलाच विस्तृत आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. ते वाचल्यानंतर कॉर्पोरेट घोटाळ्यांच्या बाबतीत वाचक अधिक सजग, सावध होऊ शकतात. एखाद्या कंपनीचे शेअर घेण्यापूर्वी तिची पार्श्वभूमी, प्रवर्तकांचे चारित्र्य विविधांगांनी तपासून पाहू शकतात. प्रवर्तकांच्या, संचालकांच्या घोडचुकांची, लबाडीची झळ येथून पुढे तरी अल्पसंख्य समभागधारकांना, कर्मचाऱ्यांना बसणार नाही, अशी आशा हे पुस्तक वाचल्यानंतर निर्माण होते. बहुतेक प्रकरणे ताजीच असल्यामुळे वाचकांनाही सर्व संदर्भ चटकन लक्षात येतात.

 • विषयप्रवेश
 • गैरव्यवहार आणि घोटाळेः पद्धती आणि शैली
 • थापेबाज कॉर्पोरेट
 • आपल्या बँका किती विश्वासार्ह?
 • झटक्यात श्रीमंत करणाऱ्या आर्थिक योजना
 • शेअर बाजारातील फसवणूक
 • जाळ्याने विणलेल्या जगातील गुन्हेगारी
 • आर्थिक हिशोबः फसवणूक आणि सर्जनशीलता
 • जेव्हा कुंपणच शेत खाते
 • औषध कंपन्या काळजी घेतात का? औषधांमुळे आजार बरा होतो का? डॉक्टरांना रुग्णांची चिंता असते का?
 • ‘निरोपाचे चार शब्द’ उघडकीस न झालेल्या घोटाळ्यांबद्दल
रॉबिन बॅनर्जी

रॉबिन बॅनर्जी हे एक वरिष्ठ व्यावसायिक कार्यकारी अधिकारी असून गेल्या ३५ वर्षात विविध २० देशांमधील अनेक मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध पदांवर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. ते एक चार्टर्ड अकौटंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकौटंट तसेच कंपनी सेक्रेटरी असून कॉमर्स शाखेचे द्विपदवीधर आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर मधे न ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in