Loading...
Image
Image
View Back Cover

भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पुनर्विचार

आव्हाने आणि नीती

भारताच्या परराष्ट्र धोरणाची चिकित्सा करण्याचा धाडसी प्रयत्न राजीव सीकरी यांचे ‘भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पुनर्विचार’ हे पुस्तक करते. काही धोरणात्मक पर्याय सुचवते, ज्यांतील काही सध्याच्या मुख्य प्रवाहातील परराष्ट्र धोरणापेक्षा विसंगत वाटू शकतात.

भारताच्या सध्याच्या परराष्ट्र धोरणातील आव्हानांची व्यूहात्मक आणि धोरणात्मक चिकित्सा हे पुस्तक करते. भारताचे भविष्यकालीन धोरण ठरवू शकतील अशा दीर्घकालीन घटकांचे आणि प्रवाहांचे विश्लेषण यात आढळते. २१व्या शतकातील झपाट्याने बदलत चाललेल्या, व्यामिश्र अशा जगात एक महासत्ता म्हणून उदयाला यायचे असेल, तर भारताला आपल्या परराष्ट्र धोरणांमध्ये आमूलाग्र बदल करावा लागेल, असा इशाराही लेखक देतो. निव्वळ महासत्ता असल्याचे ‘वाटून’ भागत नाही. त्यासाठी काही तरी वेगळे ‘करावे’ लागते. त्यानुसार धोरणे आखावी लागतात. भूतकाळातल्या चुका टाळूनच भविष्यात वाटचाल करावी लागेल, असे सीकरी सुचवतात. परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या जाणकारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठीही उत्कृष्ट पुस्तक.

 • चिन्मय आर घरेखान यांची प्रस्तावना
 • प्रास्ताविक
 • एकविसाव्या शतकातील जग
 • भारत आणि दक्षिण आशिया
 • पाकिस्तान आणि अफगाणिस्तान
 • बांगलादेश, म्यानमार आणि ईशान्य प्रांत
 • श्रीलंका, नेपाळ आणि भूतान
 • तिबेट व चीन
 • ‘पूर्वेकडे पाहा’ धोरण
 • पर्शियाची खाडी, पॅलेस्टाईन आणि इस्राइल
 • रशिया आणि युरेशिया
 • अमेरिका आणि आण्विक मुद्दे
 • ऊर्जेची सुरक्षा
 • अर्थविषयक मुत्सद्देगिरी
 • सुरक्षा आणि राजनय
 • परंपरा आणि संस्था
 • भारताला असलेली निवडीची मुभा
 • भारताचा उदय होतो आहे का?
राजीव सीकरी

राजीव सीकरी यांनी एक मुत्सद्दी म्हणून भारतीय परराष्ट्र सेवेत ३६ वर्षे व्यतीत केली. २००६मध्ये परराष्ट्र मंत्रालयात सचिव म्हणून ते निवृत्त झाले. त्या पदाअंतर्गत त्यांच्याकडे पूर्व आशिया, आसियान, प्रशांत टापू, अरब जगत, इस्रायल, इराण आणि मध्य आशिया यांच्याशी भारताच्या संबंधांची जबाबदारी होती. ते आर्थिक विभागाचे विशेष सचिव असताना परकीय अर्थविषयक संबंधां ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in