Loading...
Image
Image
View Back Cover

तुमचे प्रबंध लिखाण , 3e

पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रबंध लेखनामध्ये साह्यभूत ठरू शकेल यासाठी ‘तुमचे प्रबंध लिखाण’ हे पुस्तक लिहिले गेले आहे. पदव्युत्तर आणि डॉक्टरल संशोधनात व्यग्र असणाऱ्यांना डेटा गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे हे थरारक वाटते. पण प्रबंध लिखाण ही अतिशय धीमी आणि सबुरीचा कस लावणारी प्रदीर्घ प्रक्रिया असते. हे काम कधी संपणारच नाही असे वाटू लागते. अशा वेळी हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करेल. अगदी पहिला शब्द टाइप करण्यापासून ते तोंडी परीक्षेला जाईपर्यंत!

पॉल ऑलिव्हर हे यशस्वी प्रबंध पर्यवेक्षक असून, आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर नोंदी आणि माहितीचे रूपांतर संपूर्ण पदव्युत्तर किंवा पीएच.डी. प्रबंधांमध्ये कसे करायचे याविषयी ते मार्गदर्शन करतात. हे पुस्तक तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेची एक तयार रूपरेखाच सादर करते, जिचे अनुसरण केल्यास नियोजन आणि तयारी, सैद्धान्तिक दृष्टिकोन, प्राथमिक माहिती प्रकाशन आणि तोंडी परीक्षेची तयारी या विविध टप्प्यांचा प्रवास सुलभ होईल.

 • ऋणनिर्देश

विभाग पहिला - शैक्षणिक लेखनाची प्रक्रिया

 • संशोधन प्रबंध
 • प्रबंधाचा बौद्धिक आशय
 • तुमच्या कामाचे नियोजन करण
 • पर्यवेक्षकाची भूमिका
 • विद्यार्थी म्हणून तुमची भूमिका
 • व्याकरण, विराम न्हे, शैक्षणिक खाणाच्या प्रचलित पद्धती
 • प्रबंधाची मांडणी

विभाग दुसरा - तुमचे प्रबंध लेखन

 • सुरुवातीची पाने आणि परिचय
 • साहित्याचे परीक्षण
 • पद्धती
 • डेटा विश्लेषणाची प्रकरणे
 • निष्कर्ष
 • प्रबंध पूर्ण करणे
 • प्रबंधाची तयारी करताना निष्कर्ष प्रकाशित करणे
 • तोंडी परीक्षा
पॉल ऑलिव्हर

पॉल ऑलिव्हर हे एक शैक्षणिक लेखक आणि संशोधक आहेत. त्यांनी संशोधन पध्दती,शिक्षण,तत्त्वज्ञान, आणि धर्म याविषयांवर १९ पुस्तकांचे लेखन किंवा संपादन केले आहे. त्यांच्या पुस्तकांची ७ भाषांत भाषांतरे झाली आहेत.हडर्सफील्ड विद्यापीठात ते अनेक वर्षे व्याख्याता म्हणून कार्यरत होते तसेच डॉक्टर ऑफ एज्युकेशन अभ्यासक्रमाचे प्रमुख होते.त्यांना पदव्युत्तर आणि डॉक्टर ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in