Loading...
Image
Image
View Back Cover

देहबोली

व्यावसायिकांना मार्गदर्शन, 3e

सध्याच्या स्पर्धेच्या युगात देहबोलीवरील नियंत्रण हे एक अत्यावश्यक कौशल्य बनले आहे. अधिकारी वर्ग, मनोरंजन व्यावसायिक, राजकारणी, सेलेब्रिटी यांना यशोशिखरावर नेते ती त्यांची देहबोलीच! आजच्या युगात देहबोली हा तसा अगदी परिचित शब्द आहे. स्वतंत्र व्यावसायिक, नाटक आणि चित्रपट कलावंत, मैदानांवर कामगिरी करणारे खेळाडू, राजकारणी व्यक्ती, टीव्ही कार्यक्रमांचे सूत्रधार, रँपवर चालणाऱ्या मॉडेल्स, व्याख्याते, सादरकर्ते या सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग म्हणजे देहबोली.

हेडविग लेविस यांचे ‘देहबोली’ हे पुस्तक त्या बहुचर्चित देहबोलीचे रहस्य उलगडून दाखवते. दहा वर्षांपूर्वी या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली, त्यावेळी तिला तडाखेबंद प्रतिसाद मिळाला होता. दरम्यानच्या काळात इंटरनेट आणि विविध माध्यमांच्या उगमानंतर देहबोलीच्या संकल्पनेतही नव्याने कुतूहल निर्माण झाले आहे. व्यवस्थापनशास्त्र, मनुष्यबळ विकास यांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनीही देहबोलीच्या अभ्यासाचा आणि सरावाचा अंतर्भाव व्यावहारिक कौशल्ये या विषयाअंतर्गत केलेला आहे. त्या दृष्टीनेही हे पुस्तक महत्त्वाचे ठरले आहे.

  • प्राथमिक चाचण्या
  • देहबोलीची वैशिष्ट्ये
  • चेहरा
  • डोळे
  • डोके आणि धड
  • बाहू, हात आणि तळहात
  • शारीरिक अवस्था
  • शारीर अवकाश
  • स्वभाववैशिष्ट्ये व वृत्ती
  • दैनंदिन व्यवहारातील देहबोली
हेडविग लेविस

हेडविग लेविस हे शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक असून, त्यांनी व्याख्याता आणि प्राचार्य म्हणूनही काम पाहिले आहे. १९९३मध्ये त्यांना नवी दिल्लीतील अखिल भारतीय ख्रिस्ती उच्चशिक्षण संघटनेकडून (एआयएसीएचई) रेव्हरंड टी. ए. मथियास इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांची विविध विषयांवरील आजवर ३० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अध्यात्म, उपासना, कौशल्य विकास ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in