Loading...
Image
Image
View Back Cover

संशोधन प्रकल्प कसा करावा याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन , 2e

 • झीना ओ’लिअरी - सिनियर फेलो, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड शासनव्यवस्था संस्था

‘संशोधन प्रकल्प कसा करावा याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन’ हे पुस्तक संशोधनाच्या नियोजनापासून कार्यवाहीपर्यंत सर्व टप्प्यांसाठी उत्तम मार्गदर्शक ठरेल. त्यातून विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्याचे नेमके आकलन होईल. संशोधनाचे नियोजन, डेटा संकलन, विश्लेषण या महत्त्वाच्या आघाड्यांवर त्यांच्या ज्ञानात भरच पडेल. सर्वोत्तम पद्धतींवर भर देऊन प्रत्यक्ष संशोधनादरम्यान अनेक व्यवहार्य सल्ले आणि सूचना वाचकाला मिळत राहतात. ‘अनभिज्ञ ते तज्ज्ञ’ या प्रवासासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये हे पुस्तक पुरवते. प्रकल्प सुरू करण्यापासून तो लिहून काढेपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी प्रकरण सर्व शंकांचे निरसन करते.

या पुस्तकाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. जसे,

 • वर्कशीट्स
 • प्रत्यक्ष प्रकल्पांची उदाहरणे
 • मासिकांतील लेख
 • पत्रिका लेख
 • महत्त्वपूर्ण पारिभाषिक व्याख्या
 • प्रकरण सारांश
 • अधिक वाचनासाठी शिफारशी, शब्दसंग्रह इत्यादी.

लेखिका झिना ओ’लिअरी व्यावहारिक उदाहरणांबरोबरच केस स्टडीजही पुरवतात. संशोधन प्रकल्प पूर्ण करू इच्छिणाऱ्या कोणीही विचारलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे देतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असायलाच हवे असे पाठ्यपुस्तक.

 • चला संशोधन जगतात भरारी घेऊ या!
 • सज्ज व्हा आणि प्रारंभ करा
 • तुमचा संशोधन प्रश्न विकसित करणे
 • विश्वासार्ह आणि नैतिक संशोधनाचे काम हाती घेणे
 • संशोधन प्रस्तावाची आखणी करणे
 • साहित्याचा आढावा
 • संशोधन योजनेची आखणी
 • कार्यपद्धतींचे आकलन: संख्यात्मक, गुणात्मक आणि मिश्र दृष्टिकोन
 • कार्यपद्धतींचे आकलन: मूल्याधारित, रियाभिमुख आणि बंधमुक्त कृतियोजना
 • ‘प्रतिसादक’ शोधणे
 • प्राथमिक डेटा: सर्वेक्षण, मुलाखती आणि निरीक्षण
 • दुय्यम डेटा: स्तऐवज, डेटा संच आणि ऑनलाइन डेटा
 • संख्यात्मक डेटाचे विश्लेषण करणे
 • गुणात्मक डेटाचे विश्लेषण करणे
 • लेखनाचे आव्हान
झीना ओ’लिअरी

झीना ओ’लिअरी ह्या ‘संशोधन पद्धतीशास्त्रे’ या विषयामधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक अग्रेसर म्हणून ओळखल्या जातात. त्यांना संशोधनाचा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील निर्णयक्षमतेवर परिणाम साधणारा उपयोग करण्यात जास्त रस आहे. सिडनी येथील विद्यापीठासाठी (बिजनेस स्कूल आणि सरकारी पदवी महाविद्यालय), तसेच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथील शासकीय महाविद्यालयांमधील सं ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in