Loading...
Image
Image
View Back Cover

यशस्वी गुणात्मक संशोधन

नवशिक्या विद्यार्थ्यांसाठी व्यावहारिक मार्गदर्शन

‘यशस्वी गुणात्मक संशोधन’ हे एक सुलभ आणि प्रात्यक्षिकाधारित पाठ्यपुस्तक आहे. यशस्वी गुणात्मक संशोधनाची सुरुवात करून ते पूर्ण करण्यासाठी निव्वळ सैद्धान्तिक चर्चेमध्ये न गुंतता मौलिक सूचना आणि कळीच्या मुद्द्यांची सर्वसमावेशक दृष्टी देते.

नवशिक्यांनाही या सूचनांचा लाभ नक्कीच होऊ शकतो. गुणात्मक विश्वाच्या विलोभनीय विश्वात हे पुस्तक आपल्याला घेऊन जाते. त्याचा उद्देश आणि परिसर विद्यार्थ्यांना समजावा, संशोधनाविषयीच्या रूढ कल्पना बाजूला ठेवून ‘उघड्या डोळ्यांनी’ या क्षेत्रात काम करता यावे यासाठी व्हर्जिनिया क्लार्क आणि व्हिक्टोरिया ब्राऊन यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे जाणवते.

मूलभूत सैद्धान्तिक दृष्टिकोनांची ओळख हे पुस्तक करून देते. मग इतर दृष्टिकोनांशी तुलना आणि तफावत यांची चर्चा करते. साम्यस्थळांची ही चर्चा, कोणती पद्धती नेमकी केव्हा अनुसरावी याविषयीचे मार्गदर्शन, पॅटर्न्सच्या संदर्भात शोध घेण्याची दृष्टी अशा तिहेरी शिदोरीमुळे गुणात्मक संशोधनाच्या क्षेत्रात तुम्हाला नवीन आत्मविश्वास मिळेल.

 • आभार

भाग १- गुणात्मक संशोधनाची यशस्वी सुरुवात

 • खूप महत्त्वाची अशी काही प्राथमिक माहिती
 • गुणात्मक संशोधनाची दहा प्राथमिक तत्त्वे
 • गुणात्मक संसोधनाचे नियोजन व रेखाकन/रचना

भाग २- यशस्वीपणे गुणात्मक डाटा गोळा करणे

 • परस्पर-संबंधांनी/ देवाण घेवाणीने डाटा गोळा करणे
 • परस्पर संवादातील डाटा संग्रह
 • पाठ्यपुस्तकाचा डाटा गोळा करणेः सर्व्हे, गोष्टी, रोजनिशी आणि दुय्यम स्रोत

भाग ३- यशस्वीपणे गुणात्मक डाटाचे विश्लेषण करणे

 • विश्लेषण ध्वनिमुद्रित डाटा तयार करणे
 • विश्लेषणाकडे वळणे
 • विश्लेषणाच्या पहिल्या पायऱ्याः ओळख आणि सांकेतिक डाटा (कोडिंग)
 • संपूर्ण डाटामधील नमुने शोधणे
 • संपूर्ण डाटामधील नमुन्यांचे विश्लेषण व विवेचन

भाग ४- गुणात्मक संशोधनाची यशस्वी पूर्तता

 • गुणवत्तेचे निकष आणि गुणात्मक संशोधनाची तंत्रे
 • गुणात्मक संशोधनाचे लिखाण व प्रसार
व्हिक्टोरिया क्लार्क

व्हिक्टोरिया क्लार्क वेस्टऑफ इंग्लंड (ब्रिस्टॉल) विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सह-प्राध्यापिका आहेत. त्यांच्या संशोधनाचे केंद्रबिंदू समलिंगी पालक, समलिंगी संभोग आणि बहुलिंगी संबंध हे आहेत; याशिवाय सेक्ससंबंधीच्या सवयी/प्रथा, लैंगिकता आणि दिसणे, लैंगिकता आणि उच्चशिक्षण आणि गुणात्मक संशोधन-पद्धती. त्यांनी समलिंगी संबंध आणि नागरी सहजीवनावर संशोधन ... अधिक वाचा

व्हर्जिनिया ब्राऊन

व्हर्जिनिया ब्राऊन या न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील ऑकलंड विद्यापीठात मानसशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापिका आहेत. त्या स्त्रीवादी आणि टीकात्मक मानसशास्त्रज्ञ आहेत. लिंगवाद, शरीर, लिंग/लैंगिकता आणि आरोग्य क्षेत्रांमध्ये त्यांनी संशोधन केले आहे. बहुलैंगिकता, लैंगिक स्वास्थ्य, योनीमार्गाचा कर्करोग व त्यावरील प्रतिबंधक उपाय/धोरण लैंगिकता आणि उच्च शिक्षण, ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in