Loading...

भरत वख्लू

अध्यक्ष, वख्लू अॅडव्हायजरी

भरत वख्लू, परिवर्तनशील विचारप्रवर्तक, नवोन्मेषी आणि नैतिक मूल्यनिर्माता, नेतृत्व मार्गदर्शक, प्रमुख वक्ते आणि लेखक आहेत. गेली जवळजवळ ३५ वर्षांहून अधिक काळ कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव त्यांच्याकडे असून, या काळात त्यांनी अनेक कंपन्यांचा कायापालट केला, गुंतागुंतीच्या उद्योगविषयक समस्यांचे सर्जनशील प्रकारे निराकरण केले आणि सुयोग्य, अपेक्षित परिणाम साधण्यासाठी अनेक तज्ज्ञांच्या टीमचे समर्थपणे नेतृत्व केले. टाटा समूहात त्यांनी अनेक महत्त्वाची कार्यकारी आणि संचालक दर्जाची पदे सांभाळली. अमेरिकेतील सिकोर्स्की एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन, स्ट्रॅटफर्ड या हेलिकॉप्टर कंपनीचे भारतातील संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते फाउन्डेशन फॉर रिस्टोरेशन ऑफ नॅशनल व्हॅल्यूजचे सरचिटणीस आहेत आणि मूल्यनिर्मित आर्थिक क्रियाकलापांअंतर्गत शाश्वत, नैतिक आणि समग्र व्यवहार रुजवण्यासाठी वचनबद्ध आहेत. श्री. वख्लू चार पुस्तकांचे लेखक आहेत आणि मराठीसह सहा भाषांमध्ये पारंगत आहेत.