Loading...

ई. श्रीधरन

प्रमुख सल्लागार आणि माजी व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन

ई. श्रीधरन, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रमुख सल्लागार आणि माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. सध्या ते देशातील विविध शहरांतल्या मेट्रो प्रकल्पांना मार्गदर्शन करत आहेत. कोकण रेल्वे व दिल्ली मेट्रो प्रकल्प ठरलेल्या अंदाजपत्रकानुसार आणि वेळेअगोदर पूर्ण करणारे ज्येष्ठ तंत्रज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. जुलै २०१७मध्ये कोची मेट्रो प्रकल्प त्यांच्याच उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली ठरलेल्या निधीत आणि वेळेअगोदर पूर्ण झाला. त्यांना पद्मश्री (2001), फ्रान्स सरकारकडून नाइट ऑफ द लीजियन ऑफ ऑनर (2005) आणि पद्मभूषण (2008) या पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. ते फाउन्डेशन फॉर रिस्टोरेशन ऑफ नॅशनल व्हॅल्यूजचे अध्यक्ष आहेत आणि भ्रष्टाचारमुक्त, नैतिक भारताच्या उभारणीसाठी वचनबद्ध आहेत.