Loading...
Rajiv

राजीव सीकरी

माजी सचिव, परराष्ट्र मंत्रालय.

राजीव सीकरी यांनी एक मुत्सद्दी म्हणून भारतीय परराष्ट्र सेवेत ३६ वर्षे व्यतीत केली. २००६मध्ये परराष्ट्र मंत्रालयात सचिव म्हणून ते निवृत्त झाले. त्या पदाअंतर्गत त्यांच्याकडे पूर्व आशिया, आसियान, प्रशांत टापू, अरब जगत, इस्रायल, इराण आणि मध्य आशिया यांच्याशी भारताच्या संबंधांची जबाबदारी होती. ते आर्थिक विभागाचे विशेष सचिव असताना परकीय अर्थविषयक संबंधांची देखरेख करत असत. ते काही काळ कझकस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही कार्यरत होते. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील पश्चिम युरोप, सोव्हिएत युनियन, तसेच पूर्व युरोपातील देशांशी परस्पर व्यवहार पाहणाऱ्या विभागाचे प्रमुख पदही त्यांनी भूषवले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी पॅरिस मोहिमेचे उपप्रमुख, मॉस्को येथे राजकीय वकील, न्यूयॉर्क येथे उपमहाधिवक्ता आणि उद्योगव्यवसाय महाधिवक्ता, तसेच काठमांडू येथे प्रथम राजकीय सचिव म्हणून काम पाहिले आहे. सध्या स्वतंत्र धोरणात्मक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले सीकरी हे शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्यात व्यस्त असतात. भारताच्या परराष्ट्र धोरणविषयक प्रश्नांवर ते विपुल लेखन आणि व्याख्याने देत आहेत.